भुसावळचे आमदार दमदार ! : भुसावळच्या विकासासाठी 12 कोटी 41 लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी
आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश : रस्ते टाकणार कात
Bhusawal MLA strong ! : Administrative approval for a fund of 12 crore 41 lakhs for the development of Bhusawal भुसावळ : भुसावळ शहराच्या विकासासाठी सर्व साधारण जिल्हा उपयोजना अंतर्गत सन 2023-2024 मध्ये भुसावळ नगरपरीषद हद्दीतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत 12 कोटी 41 लाख 51 हजार 031 रुपयांच्या कामांना प्रशासकिय मंजूरी मिळाली आहे. यामुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून यातून हिवाळ्यात रस्त्यांची कामे होतील.
या कामांना मिळाली मंजुरी
भुसावळ शहरातील प्र.क्र. 24 मधील माउली नगर, महेश नगर, तुकाराम नगर या भागातील भुयारी नाली तयार करण्यासाठी 73 लाख 96 हजार 700, प्रभाग 24 मधील पियुष कॉलनी, राकेल डेपो परीसरात रस्ते काँक्रीटीकरण करणे कामासाठी 73 लाख 58 हजार 442, प्रभाग सातमध्ये रिंगरोड लगत आनंदा भोळे नगर परिसरात रस्ते काँक्रिटीकरण करणे 9 लाख 99 हजार 772, वृंदावन कॉलनी, साईबाबा मंदिर परीसरात रस्ते काँक्रिटीकरणासाठी 9 लाख 99 हजार 364, धन्वंतरी मेडिकल ते हेमराज भोळे उद्यानापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे 9 लाख 98 हजार 139, भिरूड कॉलनी परीसरात रस्ते काँक्रिटीकरण 9लाख 98 हजार 956, हुडको कॉलनी, साई कॉलनी, म्हाडा सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविणे 74 लाख 41 हजार 240, नाहाटा चौफुली ते उपविभागीय पोलिस ठाण्यापर्यंत विद्युत लाईनचे बळकटी करण करणे 99 लाख 43 हजार 343 तर सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान एकूण रक्कम 3 कोटी 61 लाख 35 हजार 956 रुपये मंजूर झाले आहेत. यासोबतच अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर प्रशासकीय मंजुरी चार कोटी 94 लाख 71 हजार रुपये व भुसावळ नगरपरीषद हद्दीतील नागरी दलितेत्तर योजने अंतर्गत 2 कोटी 45 लाख 63 हजार 823 रुपये असा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अग्निशमन सेवा होणार बळकट
महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हा स्तर) योजनेंतर्गत महाराष्ट्र अग्निशमन बळकटीकरण अग्निसुरक्षा अभियान योजनेतंर्गत भुसावळ अग्निशमन वाहन (11 टन व 18 टन) खरेदी करण्यासाठी 1 कोटी 39 लाख 80 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
शहराचा सर्वांगीण विकास
भुसावळ नगरपरीषदेत येथे जिल्हा नियोजन विभागामार्फत पालकमंत्री गुलाब पाटील यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी एकूण 12 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीला प्रशासकिय मंजूरी मिळाल्याने आता पुढील प्रक्रिया होईल. शहर व ग्रामिण भागातील सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्न सार्थकी ठरत असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले.

