अट्रावलच्या यात्रोत दहिगावच्या तरुणाला मारहाण


यावल : तालुक्यातील दहिगाव येथील राहणार्‍या एका तरूणास काही अज्ञात तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना 3 फेब्रुवारी रोजी अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत सार्वजनिक ठिकाणी घडली. याप्रकरणी अज्ञात तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अट्रावलला प्रसिद्ध देवस्थान मुंजोबा यात्रा सुरू असुन या यात्रेच्या दरम्यान दहिगावच्या शुभम संतोष पाटील यास काहींनी बेदम मारहाण केली. शुभम पाटील हा अट्रावल येथील मुंजोबा यात्रेत दर्शनासाठी गेला असता यात्रेत आलेल्या मोठ्या पाळण्यावर बसण्यासाठी तो गेला असता तेथे खाली पाळण्यात बसत असताना अज्ञात तरुणांनी पाळण्यात बसू नको, असा दम देत त्याला बेदम मारहाण केली. दुखापत झालेल्या शुभम संतोष पाटील या तरुणावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून व त्यास पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावल पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !