जुन्या ट्रिलरला रंगरंगोटी करीत वयोवृद्धेला अडीच लाखांचा गंडा
An old man was robbed of two and a half lakhs by repainting an old trailer धरणगाव : जुन्या पॉवर ट्रिलरला रंगरंगोटी करून त्यास बनावट लेबल लावून आव्हाणी गावातील वृद्ध महिलेची तब्बल दोन 2 लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात अन्नपूर्णा खंडेराव पाटील (72) या वयोवृद्धा कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात टिलर करण्याचे साहित्य घेण्यासाठी पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर (रा.नेवासा, ता.शेगाव, जि.अहमदनगर) यांच्याशी 14 मार्च 2023 ते 21 सप्टेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी संपर्क साधला होता व दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचे पॉवर टिलर घेण्याचे ठरले व रक्कमही देण्यात आली मात्र बाबूराव खेडकर याने वृद्ध महिलेला ठरल्याप्रमाणे पॉवर ट्रिलर न देता किर्लोस्कर कंपनीची बनावट लेबल लावून जुन्या मशीनला कलर देऊन ते नवे असल्याचे भासवत पॉवर ट्रिलर हे दिले.


आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्नपूर्णा पाटील यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत फिर्याद दिल्यानंरत शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता अहमदनगर येथील पृथ्वीराज मोटार्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खंडेराव खेडकर यांच्या विरोधात धरणगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन करीत आहे.
