खोटे नगरातील 35 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल ; बहिणींचा मन हेलावणारा आक्रोश
जळगाव : तीन विवाहित बहिणींच्या एकूलत्या एक भावाने जीवनयात्रा संपविल्याचा प्रकार रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास खोटे नगरात घडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बाळासाहेब लोटन पवार (35, रा. खोटेनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आई-वडीलांच्या निधनानंतर खोटे नगरात बाळासाहेब पवार हा भाडे तत्वावर वास्तव्यास होता शिवाय जळगाव एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होता. त्याच्या तीन बहिणींचे लग्न झाले आहे. रविवार, 8 ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी बाळासाहेब घराबाहेर आला नसल्याने घरमालक त्याला पहायला गेले असता त्यांना हा तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.


आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. त्याला तातडीने पोलिसांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविदयालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत बाळासाहेब पवार याला तीन बहिणी असून त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यातील नंदाडे येथे राहतात. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
