सोशल मीडियावर महापुरूषांबाबत अवमानकारक पोस्ट : अमळनेर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा
Derogatory posts on social media about legends: A case against two in Amalner police अमळनेर : महापुरूषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणार्या दोन तरूणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील जानवे व रणाईचे येथील तरुणांनी एका महापुरुषाबाबत समाज माध्यमावर अत्यंत अश्लील भाषेत आणि आक्षेपार्ह टीका केली होती. या तरुणांवर काल अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली. अॅट्रासिटी व इतर कायद्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हरीश बोरसे (रणाईचे, ता.अमळनेर व आरोपी कल्पेश पाटील (राहणार जानवे ता.अमळनेर) यांनी दि. 6 रोजी इंस्टाग्राम आक्षेपार्ह पोस्ट व कमेंट केली होती. महापुरूषांबाबत ही पोस्ट व कमेंट करण्यात आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या संदर्भात समाज बांधवानी अमळनेर पोलीस ठाणे गाठत संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार समाधान मैराळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता 1860 नुसार 294 295 -, 504, 500, 3 1 आर, 31 यू, 31 व्ही या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाडकर करीत आहेत.
