जळगावात तरुणीवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार : आरोपीला अटक


Rape of young woman in Jalgaon threatening to spread her photo virally : Accused arrested जळगाव : जळगाव शहरातील एका भागातील तरुणीवर सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित आरोपी दानीश अकबर तडवी (19, जळगाव) यास अटक करण्यात आली.

ओळखीचा गैरफायदा घेत अत्याचार
जळगाव शहरातील एका भागात 18 वर्षीय तरुणी आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. पीडीत तरुणी ही अल्पवयीन असतांना 2019 पासून संशयित आरोपी दानीश तडवीला ओळखत होती. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत दानीश तडवी याने तरूणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सुरूवातीला अश्लिल कृत्य केले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील बनविले. यानंतर 2022 मेहरुण परीसरात एका ठिकाणी पीडीत तरुणीला फोटो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्रास देणे सुरूच होते. हा प्रकार सहन न झाल्याने पीडीत तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पथकाने संशयित आरोपी दानीश तडवी याला रामेश्वर कॉलनी परीसरातून अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रूपाली महाजन, अल्ताफ पठाण, योगेश बारी, मुकेश पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !