वसंतवाडीतील प्रौढाचा बुडाल्याने मृत्यू ; भुलाबाई विसर्जनादरम्यान दुर्घटना
Vasantwadi adult dies due to drowning ; Accident during Bhulabai immersion
जळगाव : वसंतवाडी येथील प्रौढाचा भुलाबाई विसर्जनादरम्यान तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. रमेश भिका चव्हाण (41, वसंतवाडी) असे मयताचे नाव आहे. तब्बल 22 तासानंतर एनडीआरएफच्या पथकास मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास यश आले.
पाण्यात बुडून मृत्यू
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील रमेश भिका चव्हाण एका खासगी कंपनीत हमाली काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. सोमवारी गावातील काही मुली भुलाबाई विसर्जनासाठी तलावावर गेल्या असता येथे रमेश चव्हाण काठावरून भुलाबाई घेऊन पाण्यात नेत असताना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास चव्हाण पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला असता दुसर्या दिवशी मंगळवारी सकाळी शोध मोहिम राबवण्यात आली. मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पट्टीच्या पोहणार्यांनी चव्हाण यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.


रमेश चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुल, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास हवालदार विकास सातदिवे करीत आहेत.
