धरणगावातील प्रौढाचा चारचाकी वाहनाच्या धडकेने मृत्यू
An adult in Dharangaon died after being hit by a four-wheeler धरणगाव : भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत धरणगाव शहरातील परधीवाडा भागातील 44 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 29 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र हिलाल पारधी (44, पारधीवाडा, धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
पादचार्यास उडवले
धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे जितेंद्र पारधी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. 29 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास कामावरून घरी पायी जात असतांना मागून चारचाकी वाहन क्रमांक (एमएच 19 ईए 5444) ने जोरदार धडक दिल्याने अपघातात जितेंद्र पारधी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला.


अपघात होताच चालक हा चारचाकी वाहन घेवून पसार झाला. याप्रकरणी मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास चारचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.
