किनगावमध्ये मारोती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली


यावल : तालुक्यातील किनगाव येथील मारुती मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करीत दानपेटी फोडल्याने गावात खळबळ उडाली आहे. दानपेटीतून किती रक्कम चोरीस गेली? हे मात्र कळू शकले नाही. दानपेटीतील रक्कम चोरट्यांंनी फोडण्याचे वृत्त किनगाव बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावात पसरताच मंदिर परीसरात मोठा जमाव जमला. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, चोरट्यांचा माग काढण्यासाठी जळगाव येथून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !