नशिराबाद महामार्गावर भीषण अपघात ; बुलढाणा जिल्ह्यातील विवाहिता ठार
प्रवासी रीक्षावर भरधाव बलेनो आदळली ; मयत बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी
Fatal accident on Nashirabad highway; Two people were killed, including a married woman नशिराबाद : भरधाव बलेनो प्रवासी अॅपे रीक्षावर आदळून झालेल्या अपघातात महिला प्रवासी ठार झाली तर रीक्षातील चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला. आस्माबी शेख मंजूर (30, रा.बोरखेडी, ता.मोताळा, जि.बुलढाणा) असे ठार विवाहितेचे नाव असून रीक्षातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
रीक्षावर आदळली बलेनो
जळगावकडून प्रवासी रीक्षा (एम.एच.19 बी.यू.5843) ही कलर व प्रवाशांना घेवून भुसावळकडे बुधवारी सायंकाळी येत असताना पाठीमागून आलेली भरधाव कार (एम.एच.19 ई.ए.5109) ही रीक्षावर आदळली. या अपघातात रीक्षा काही अंतरावर फेकली जावून उलटी झाल्याने रीक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला तर रीक्षातील चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडला


नशिराबाद पोलिसांची धाव
जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरीष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. केले.
अपघातात चौघे गंभीर
या अपघातात रीक्षातील जुबेर शेख मेहबुब शेख (40), करीम बेग शरीफ बेग (वय 29), शेख सादीक शेख इसार (40) व शेख उमेमा शेख जुबेर (6) हे चौघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
