जळगावातील 23 वर्षीय तरुणी बेपत्ता
23-year-old girl missing from Jalgaon जळगाव : शाळेमधून एल.सी.घेवून येते अशी चिठ्ठी लिहून घराबाहेर पडलेली 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार, 10 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.
कुटुंबातील सदस्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तिचा तपास लागला नाही. याप्रकरणी तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपास हवालदार प्रवीण जगदाळे करत आहे.


