डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी लंपास


Dr.Ulhas Patil’s two-wheeler from the premises of the hospital जळगाव : डॉ. उल्हास पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातून सुमारे 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी मंगळवार, 10 रोजी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संधी मिळताच लांबवली दुचाकी
हेमंत मुरलीधर गिरीराजन आप्पासाहेब साळवे (24) हा तरुण शिक्षण घेतो व तो मूळ साकेगाव, ता.नेवासे येथील रहिवासी आहे. शुक्रवार, 6 रोजी वैद्यकीय महाविद्यालयात त्याने त्याच्या मालकीची दुचाकी (एम.एच.16 सी.एल.6254) पार्क केली असता अज्ञात चोरट्याने ती रात्री 8.15 वाजेच्या सुमारास लांबविली. हेमंत याने दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी तक्रारीवरुन नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन देशमुख करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !