गोण्यांमध्ये वाळू भरून अवैध वाहतूक : ओमनी चालकाविरोधात गुन्हा


Illegal transport by filling sacks with Ssand : Crime against Omni Driver चाळीसगाव : ओमनी वाहनातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी चालकाविरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताने 43 हजार रुपये किंमतीची वाळॅ गोण्यांमध्ये भरल्याचा प्रकार समोर आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे-देहराबर्डी रस्त्यावरून ओमनी गाडीत गोण्यांमध्ये वाळू भरून वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. गुरुवार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मेहुणबारे ते देहराबर्डी रस्त्यावरून संशयित सोनु सुरेश महाजन (27, नवेगाव, मेहुणबारे) हा तरुण ओमनी गाडीमध्ये गोण्यांमध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी 43 हजार रुपये किंमतीची वाळ ूजप्त केली. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोनू सुरेश महाजन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार शामकांत सोनवणे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !