नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाचा पित्यावर हल्ला : जळगावातील घटना


Son attacks father for not paying for drugs : Incident in Jalgaon जळगाव : नशा करण्यास पैसे नाकारल्याचा राग मनात धरुन मुलाने जन्मदात्या बापावर सुरीने वार करीत हल्ला केला. ही घटना गुरुवार, 12 रोजी 11 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज नगरातील गेंदालाल मिल परीसरात घडली. या हल्ल्यात संतोष वामन लिंगायत (50) हे जखमी झाले.

पैसे न दिल्याने सुरीने केला हल्ला
संतोष लिंगायत हे चालक असून गेंदालाल मिल बिल्डींग नं.34 रुम नं.40 याठिकाणी वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा महेश लिंगायत (23) याने वडिलांकडे नशा करण्यासाठी 100 रुपयांची मागणी केली परंतु नशा करण्यास त्यांनी पैसे दिले नाहीत. हा राग मनात धरुन महेश याने गुरुवारी दुपारी हातातील सुरीने संतोष लिंगायत यांच्या छातीवर वार करत जखमी केले. त्यांना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले.



पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी जावून प्रकाराची माहिती घेतली. याप्रकरणी संतोष लिंगायत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा महेश याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार राजकुमार चव्हाण तपास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !