मुक्ताईनगरात ओव्हरटेकच्या प्रयत्नात चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार ठार
A two-wheeler rider was killed when he was under the wheel while trying to overtake in Muktainagar मुक्ताईनगर : बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली येताच ठत्तर झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. अपघातात दुचाकीवरील एक जण बचावला. हा अपघात मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयसमोर घडला. किसन उर्फ कृष्णा तलवारे (34, बोदवड, ह.मु. इच्छापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे,
ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुर्घटना
मुक्ताईनगर शहरातून गेलेल्या छत्रपती संभाजीनगर ते बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर ट्रक रस्त्यात उभा असल्याने त्याचवेळी मागून येणार्या बस क्रमांक (एम.एच.10 डी.एल.3555) ला दुचाकीस्वार किसन तलवारे यांनी ओव्हरटेक केले. यावेळी दुचाकीवर तुळशीराम वानखेडेदेखील होेते मात्र वाहनावरील ताबा सुटल्याने तलवारे बसखाली येवून गतप्राण झाले तर सुदैवाने सोबत असलेला तुळशीराम वानखेडे थोडक्यात बचावला. अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


