भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन


नागरीकत्व विधेयक कायद्याला तीव्र विरोध : संविधान बचाओ समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

भुसावळ : सुधारीत नागरीकत्व कायद्याला तीव्र विरोध दर्शवित नागरीकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी व सीएए) रद्द करण्याच्या मागणीसाठी 15 जानेवारीपासून भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर संविधान बचाओ समितीतर्फे साखळी उपोषण छेडण्यात आले आहे. या आंदोलनात बुधवारी थाळीनाद करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले तसेच कायदा रद्द करावा या मागणीसाठी तहसीलदारांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.

थाळीनाद आंदोलनात यांची उपस्थिती
या आंदोलनात बुधवारी आंदोलकांनी थाळीनाद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, फिरोज शेख, यावेळी हाजी सलीम चुडीवाले, माजी नगरसेवक साबीर शेख, जुनेद खान, मजहर शेख, अजहर शेख, जुलेद खान, नाजीम कादरी, शे. आरिफ, शे. इद्रीस बागवान, सलीम खान, सरदार उस्मान पिंजारी, डॉ. इमरान खान, असलम खान, युसुफ खान, राजू चौधरी, अ. असलम खान आदींची उपस्थित होती. दरम्यान, भारताने लोकशाही स्वीकारली असून, देशातील सर्व जाती-धर्मांच्या नागरीकांना समान अधिकार आहेत. घटनेने नागरीकांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे मात्र सुधारीत नागरीकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन दिल्ली पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. सरकारने आणलेला नागरीकत्व दुरुस्ती कायदा घटनाबाह्य असल्याने हा कायदा रद्द करण्यात यावा या माणीसाठी भुसावळात संविधान बचाव समितीने 15 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडले आहे.

वरणगाव शाह बिरादरीचा पाठिंबा
साखळी उपोषणाला वरणगाव शाह बिरादरीतर्फे मंगळवारी पाठिंबा दर्शवण्यात आला. या संदर्भात निवेदन प्रशासन व आंदोलकांनाही देण्यात आले. निवेदनावर जावेद शाह हाजी बाब शाह, अकबर शाह मेहबूब शाह, हसन शाह गुलाम शाह, अलीशाह वजीर शाह, आसी शाह दिलावर शाह, रहिम शाह लुकमान शाह, जमील शाह जहीर शाह आदींची नावे आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !