मधुकर साखर कारखाना सुरू करण्याबाबत तहसील प्रशासनाला साकडे


The tehsil administration was asked about starting Madhukar sugar factory यावल : यावल तहसील कार्यालयात तालुक्यातील शेतकर्‍यांनी एकत्र येत गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेला मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची मागणी केली. कामगारांनीदेखील कारखान्याकरीता सकारात्मक विचार करून कारखाना सुरू होण्याकरीता सहकार्य करण्याची मागणी केली. न्हावी, ता.यावल जवळील मधुकर सहकारी साखर कारखाना हा कधीही खंड न पडता 45 वर्ष सुरळीतपणे सुरू होता मात्र गेल्या चार वर्षापासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे. कारखाना मागील वर्षी सुरू होणार होता म्हणून परीसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते परंतु थकीत रक्कमेसाठी कामगारांनी आंदोलन केल्यामुळे कारखाना ठप्प झाला.

यांची निवेदन देताना उपस्थिती
निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे शेतकरी देविदास धांगो पाटील, अनिल बजगुजर, डॉ.राजेंद्र झांबरे, प्रमोद भिरूड, दिलीप भिरुड, सुनील भिरुड, गणेश भिरुड, घनःश्याम झांबरे, पद्माकर भिरुड, सुरेश चौधरी, घनःश्याम झांबरे,ललित महाजन, योगेश महाजन, मोतीलाल महाजन, पंकज महाजन, दिनेश नाफडे, भोजराज येवले, प्रमोद महाजन, अमोल पाटील, धनराज पाटील, कोळवद सरपंच याकुब तडवी, विकासो चेअरमन अनिल पाटील, जयंत महाजन सह मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.

कारखाना सुरू झाल्यास होईल फायदा
कारखाना येत्या हंगामात सुरू झाल्यास सर्व ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यावर अवलंबून असलेले सर्व घटक यांना त्याचा लाभ होईल तसेच अर्थचक्र सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना संचलित मे.इंडीया बायो अ‍ॅण्ड ग्रो पॅसिफिक प्रा. लि. कंपनीच्या चालकांनी यावल तालुक्यातील काही ऊस लागवड करण्यार्‍या शेतकर्‍याच्या भेटी घेऊन ऊस लागवड करण्यासाठी चर्चा केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !