जळगावच्या कांचन नगरात धाडसी घरफोडी : 63 हजारांचा ऐवज चोरीला


Daring house burglary in Kanchan Nagar of Jalgaon : 63 thousand worth stolen जळगाव : शहरातील कांचन नगरात धाडसी चोरी झाली. बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तसेच कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचे दागिने असा एकूण 63 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना कांचन नगरातील रविशंकर नगरात शनिवारी सकाळी उघडकीस आली.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
एकनाथ भगवान सपकाळे (58) हे हातमजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. ते शिवशंकरनगर कांचननगर परीसर नयन किराणाजवळ याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. एकनाथ सपकाळे हे बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी ही संधी हेरत या बंद घराचा कडीकोयंडा तोडला. आत घरात प्रवेश करुन चोरट्यांनी लोखंडी कपाटाकडे मोर्चा वळविला. मुद्देमाल हाती लागताच चोरट्यांनी येथून पलायन केले. याप्रकरणी एकनाथ भगवान सपकाळे (58)
यांच्या तक्रारीवरुन शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिीरक्षक चंद्रकांत धनके हे करत आहे.



असा गेला ऐवज चोरीला
30 हजार किंमतीचे 4 सुटे मणी तसेच मंगळ सूत्राची वाट्यांची जोड , कानातील टोंगल वजन 5 ग्रॅम 890 ग्रॅम, 30 हजारांचे मणी मंगळसूत्र सहा ग्रॅम वजनाचे, तीन हजार किंमतीचे 8 पैलू मणी 5 ग्रॅम वजनाचे असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !