भुसावळात 175 मंडळांनी केली माँ दुर्गेची स्थापना


भुसावळ : ढोल-ताश्यांसह पारंपरीक वाद्यांच्या गजरात शहरासह तालुक्यात माँ दुर्गेची विधीवत मातेची स्थापना करण्यात आली. रविवारपासून नवरोत्सवाला सुरूवात झाली असून बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. शहरात 175 तर ग्रामीण भागात 104 मंडळांनी दुर्गेची स्थापना करण्यात आली. घटस्थापनेमुळे शहरातील बाजारपेठेत मोठे चैतन्याचे वातावरण होते. बाजारात झेंडूच्या फुलांंचे भाव 40 ते 60 रुपये किलोप्रमाणे विक्री झाली तर रात्रीपासूनच विक्रेते मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते. या शिवाय घट व पूजेचे साहित्य खरेदी करण्यात आले.

मुक्ताईनगर तालुक्यातील 89 सार्वजनिक मंडळांकडून स्थापना

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात 89 सार्वजनिक दुर्गा मंडळांनी तर 48 खाजगी दुर्गा मंडळांना पोलिस प्रशासनाने परवानगी दिल्याने या मंडळांतर्फे विधीवत स्थापना करण्यात आली. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली 40 पोलिस कर्मचारी तर 40 होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !