जळगावातील विद्यार्थ्याची दुचाकी लांबवली
The bike of a student in Jalgaon was extended जळगाव : शिक्षणासाठी महाविद्यालयात गेलेल्या विद्यार्थ्याची मोटारसायकल भामट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवार, 10 रोजी सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास शहरातील डी.एन.सी.कॉलेजसमोर मोकळ्या जागेत घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल
रोहन विजय चव्हाण (20) हा युवक कुटुंबासह अयोध्या नगरात अशोकनगर येथे वास्तव्यास आहे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. 10 रोजी सकाळी रोहन हा नेहमीप्रमाणे कॉलेजला क्रमांक (एम.एच. 20 जी.एम.5134) या दुचाकीने महाविद्यालयात आला. कॉलेजसमोर दुचाकी लावून तो वर्गात गेला. चोरट्यांनी लॉक तोडत रोहनची दुचाकी चोरुन नेली. दहा वाजता रोहन हा आला असता त्याला दुचाकी दिसली नाही. मित्रांना तसेच परीसरात शोध घेतला मात्र दुचाकी मिळाली नाही. याप्रकरणी तक्रारीवरुन गुन्हा शनीपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. तपास हवालदार परीष जाधव करत आहे.


