सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
Mandiali of devotees for darshan of Mother Manudevi, a resident of Satpura यावल : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आई मनुदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाला सुरवात झाली आहे. रविवारी सकाळी विधीवत घटस्थापना झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होताच सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली.
राज्यभरातून भाविक दाखल
खान्देश कुलदैवत सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात रविवारी सकाळपासूनच घटस्थापनेची लगबग होती. सकाळी 11 वाजत विधीवत घटस्थापनेच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रथम पूजा व घटस्थापनेचा मान आडगाव येथील रहिवासी तथा संस्थेतील पदाधिकारी नितीन भास्कर पाटील, मीनाक्षी नितीन पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील व दीपाली ज्ञानेश्वर पाटील या दाम्पत्यास देण्यात आला. नवरात्रीचा पहिला दिवस व रंग नारंगी असल्याने आई मनुदेवीला नारंगी रंगाचा शालू नेसवण्यात आला. घटस्थापनेनंतर आरती पार पडली व मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी मनुदेवी संस्थाध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव नीळकंठ चौधरी, खजिनदार सोपान वाणी, विश्वस्त सतीश पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, चिंधू महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, चंदन वाणी, कर्मचारी व्यवस्थापक आर.के.पाटील यांची उपस्थित होती. पौरोहित्य दगडू महाराज यांनी केले. मंदिराचे कर्मचारी गोपाळ पाटील, शशीकांत कोळी, किरण कोळी, दुकानदार विश्वजीत पाटील व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
माजी खासदारांचे सकुटुंब दर्शन
पहाटे श्री क्षेत्र मनुदेवी येथे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यासह संपूर्ण परीवाराने आई मनुदेवीचे दर्शन घेतले. यावेळी गोदावरी फाऊंडेशन आधारस्तंभ गोदावरी पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, संचालिका डॉ.केतकी पाटील, सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, किवा पाटील, सारा पाटील उपस्थित होते.

