नोकरीचा पहिला दिवस ठरला अखेरचा ! जळगावातील तरुणाचा कंपनीत शॉक लागल्याने मृत्यू
The first day of the job was the last ! A young man from Jalgaon died due to shock in the company जळगाव : नोकरीच्या पहिल्याच दिवशी शॉक लागल्याने मजूर कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगावातील एमआयडीसीतील प्लास्टीक कंपनीत घडली. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. राहुल दरबार राठोड (22, रा.शेलगाव, ता.बर्हाणपूर, मध्यप्रदेश, ह.मु.फातीमा नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत जीवन गजानन चौधरी (रा.बेटावद, ता.जामनेर) हा तरुण गंभीर जखमी झाला.
पहिला दिवस ठरला आयुष्याचा अखेरचा
फातेमा नगरातील रहिवासी असलेला राहुल राठोड हा पूर्वी वेल्डींगचे काम करीत होत मात्र सोमवारपासून तो एमआयडीसीतील एस 28 सेक्टरमधील एका प्लास्टीकच्या कंपनीत कामाला लागला. सकाळी आठ वाजेच्या सुमारास तो कामावर हजर झाल्यानंतर मशनवरीवर काम करीत असतांना राहुल व त्याच्यासोबत काम करणार्या जीवन चौधरी यांना मशिनरीचा शॉक लागला. दोघे दूर फेकले गेल्यानंतर राहुल राठोड याचा दुर्देवी मृत्यू झाला तर जीवन चौधरी गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कुटूबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !
काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मयत राहुलच्या वडिीलांना अपंगत्व आले व त्यानंतर कर्ता पुरुष म्हणून राहुलवर जवाबदारी होती मात्र काळाने झडप घालत त्यालाही हिरावून घेतल्याने राठोड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कंपनीत कामावर रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी राहुलचा त्याचा दुदैवी अंत झाल्याने जिल्हा रुग्णालयात राहुलचा मृतदेह बघून त्यांच्या कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
