जळगावात चोरटे सैराट : शिव कॉलनीत घर फोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबवला


Thieves Sairot : A house in Shiv Colony was broken into and a ransom of Rs जळगाव : बंद घर चोरट्यांना पर्वणी ठरू पाहत आहे. जळगाव शहरातील शिव कॉलनी परीसरातील तरुणाच्या घरातून अ‍ॅम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सर मिळून एक लाख 11 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
प्रदीप सुदाम वाणी (36, भवानी मंदीराजवळ, मेहरूण) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. त्याचे शिवकॉलनीत घर आहे. या घरात त्याने मंडपा व स्टेजसाठी लागणारे अ‍ॅम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सर असे सामान ठेवले होते. 29 सप्टेंबर रोजी अडीच वाजता सर्व सामान घरात ठेवून कुलूप लावलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत म्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सरअसा एकुण 1 लाख 11 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.



हा प्रकार रविवार, 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रदीप वाणी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !