जळगावातील दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler thief in Jalgaon caught by MIDC police जळगाव : दुचाकी चोरीनंतर पसार असलेल्या भामट्याच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आकाश संजय नागपुरे (19, रा.शिरसोली, ता.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दुचाकी चोरीप्रकरणी दाखल होता गुन्हा 
जळगाव तालुक्यातील जळके पाटील गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणारे किरण हिलाल चिमणकारे यांच्या मालकीची दुचाकी 24 जून रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी शिरसोली येथील आकाश नागपुरे याने चोरल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.



पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हवालदार गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास आकाशच्या गावातूनच मुसक्या आवळल्या. तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !