भरधाव कंटेनरने उडवल्याने हॉटेल कारागीर ठार


जळगावजवळील दूरदर्शन टॉवरजवळ मध्यरात्री अपघात : संतप्त ग्रामस्थांचा दोन रस्ता रास्ता रोको

जळगाव : चायनीज दुकानावरील कामाला असलेला कारागीर काम आटोपून घराकडे निघाला असतानाच पाठीमागून आलेल्या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाळू देविदास पाटील (35, रा. देवपिंप्री, ता. जामनेर, ह.मु. मण्यारखेडा, ता.जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव-भुसावळ मार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

हद्दीच्या वादामुळे ग्रामस्थ संतप्त
कालिका माता चौकातील चायनीज दुकानावर कारागीर असलेले बाळू पाटील हे बुधवारी रात्री 11 वाजता काम आटोपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.19 डी.एफ.8820) घरी जात असताना मागून आलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने बाळू यांचा जागीच मृत्यू झाला. हद्दीच्या वादावरून पोलिसही घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करून तासभर ठिय्या आंदोलन केले. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ आल्यानंतर त्यांनाी जाब विचारण्यात आला. मृताच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई, भाऊ असा परीवार आहे. दरम्यान, कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !