काका-पुतणीत अनैतिक संबंध ; दुसर्‍या तरुणाशी बोलत असल्याच्या संशयातून पुतणीला संपवले


कोपरगाव : काका-पुतणीत असलेल्या अनैतिक संबंधातून पुतणी माहेरी गेल्यानंतर दुसर्‍याशी बोलत असल्याच्या संशयातून तिचा काकाने खून केला. ही घटना कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या खडकी भागात घडली. या घटनेत नेहा संदीप कांबळे (21, ह.मु.सप्तशृंगी मंदीराजवळ खडकी) असे मयत विवाहितेचे नाव आहे. संतोष हरीभाऊ आरणे (26, रा.खडकी) असे अटकेतील आरोपी काकाचे नाव आहे.

काकाने केला पुतणीचा खून
नेहा संदीप कांबळे ही अनेक दिवसांपासून माहेरी म्हणजे आई ज्योती नंदकिशोर आरणे यांच्याकडे खडकी भागातील सप्तशृंगी माता मंदिराजवळ आल्यानंतर बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ती घराबाहेर लघुशंकेसाठी आली असता काका तथा संशयित संतोष आरणे याने ‘तु दुसर्‍या तरूणासोबत का बोलतेस’ म्हणून संतापात नेहाच्या दोन्ही पायांवर सोबत आनलेल्या कुर्‍हाडीने वार केले. उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे तीचा मृत्यू झाला.



घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नरीक्षक प्रदीप देशमुख हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोंचले. पंचनामा केल्यानंतर लगेचच शोध घेऊन संतोष आरणे यास अटक करण्यात आली. दरम्यान, मयत नेहा संदीप कांबळे व तिचा काका संतोष आरणे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !