भुसावळला उद्या ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा


Bhusawal to hold OBC reservation rights convention tomorrow भुसावळ :  अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद रावेर विभागाच्या वतीने भुसावळ येथे शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता, नाहाटा महाविद्यालयाजवळील माळी समाज मंगल कार्यालय, माळी भवनात ओबीसी आरक्षण अधिकार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर लोकसभा विभागातील भुसावळ येथे ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा होत आहे. या महाममेळाव्यात ओबीसी आरक्षणावर गदा येता कामा नये, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासह अनेक मागण्या या मेळाव्यात होणार आहे.

यांची मेळाव्याला राहणार उपस्थिती
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक समता परीषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीपअण्णा खैरे, जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, अशोक नडे, ज्ञानेश्वर महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महामेळाव्याला रावेर लोकसभा विभागातील भुसावळ, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, यावल येथील ओबीसी घटकातील समाजबांधवानी जास्तीत-जास्त संख्येने या मेळाव्याला यावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रा.जतीन मेढे, जामनेर तालुकाध्यक्ष नरेश महाजन, कार्याध्यक्ष पवन माळी, बोदवड तालुकाध्यक्ष दिनेश माळी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष राजु माळी, रावेर तालुकाध्यक्ष, यावल तालुकाध्यक्ष सुभाष महाजन यांनी केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !