जखमी प्रवाशाला वाचवण्यासाठी देवळाली शटल एक किलोमीटर मागे धावली


पाचोरा : देवळाली-भुसावळ पॅसेंजर सकाळी चाकरमान्यांसह प्रवाशांची गर्दी वाढल्याने या गर्दीतच पाचोर्‍यातील प्रवासी राहुल संजय पाटील हे परधाडेनजीक पडले मात्र ही बाब लक्षात येण्यापूर्वीच गाडीने सुमारे एक ते दिड किलोमीटर अंतर पार केले होते. याबाबतची माहिती गार्ड तसेच ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेने कळवताच चालकाने जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी शटल सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत मागे घेतली. जखमी अवस्थेतील राहुल पाटील यांना शटलमध्ये घेतल्यानंतर अधिक उपचारार्थ माहिजी स्टेशन मास्टर यांच्या कक्षात सोडण्यात आले तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार तातडीने हालचाल केली. जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी चालकासह गार्डने दाखवलेल्या माणुसकीचे मात्र सर्वसामान्य प्रवाशांनी तोंडभरून कौतुक करीत अशाच पद्धत्तीने सहकार्याची अपेक्षाही रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !