वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद


Do the work of Varangaon water supply scheme at a fast pace : Collector Ayush Prasad भुसावळ : वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन व आमदार संजय सावकारे यांच्याकडे केल्यानंतर या तक्रारीची दखल घेत दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तातडीने आढावा बैठक घेण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेत त्यांच्या दालनात जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, मुख्याधिकारी समीर शेख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता लोखंडे, कंत्राटदार शहा आदींच्या उपस्थितीत बैठक घेत पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना केल्या.

पाण्यासाठी नागरीकांचे हाल : सुनील काळे
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी काळे सध्या पंधरा दिवसाआड पिण्याचे पाणी येत असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे सांगत अश्याच संथगतीने योजनेचे काम सुरू राहिल्यास पिण्याचे पाणी हे एक महिन्यानंतर वरणगावकरांना मिळेल परीणामी लोक मोर्चे काढतील व आंदोलन करून आक्रोश व्यक्त करतील, अशी तक्रार केली. योजनेला गती देण्यासह सांडपाणी प्रकल्प हा नव्याने शासनाकडे मंजुरीसाठी नगरपरीषदेने दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तातडीने योजनेला गती द्या
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांनी योजनेबाबत सविस्तर घेत पाणी योजनेचे काम रात्रं-दिवस एक करून वेगाने वाढवावे व ज्या-ज्या टाक्या पूर्ण झाल्यानंतर त्या परीसरातील पिण्याचे पाणी सोडण्याचे नियोजन उन्हाळ्याच्या आता करावे, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी बैठकीत दिले. प्रतिभा नगर व विकास कॉलनीमधील टाकीचे काम जॅकवेलच्या मोटारपंप बसवण्याच्या कामाला सुरूवात करा तसेच नगरपरीषदेने नवीन सांडपाणी प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी समीर शेख यांना दिल्या. लवकरच पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी मी वरणगावला येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगत गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही, असेही त्यांनी ठणकावून यावेळी सांगितले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !