‘रनर्स’च्या 40 धावपटूंनी गाजवली ‘फॉरेस्ट मॅरेथॉन’


भुसावळ : बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मॅरेथॉनमध्ये भुसावळ येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.चारुलता पाटील महिला गटात 21 किमी स्पर्धेत तृतीय आल्या. ुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 40 धावपटूंनी ही मॅरेथॉन स्पर्धा गाजवली. बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी, ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स व रन बडीज पुणे यांच्यातर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत 3 किमी, 5 किमी, 10 व 21 किमी या चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, द्वितीय 10 हजार रुपये व तृतीय क्रमांकास पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. बुलडाणा शहरापासून 13 किमी अंतरावरील बोथा अरण्यात ही स्पर्धा झाली. सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी वन्यजीव प्राण्यांची केलेली वेशभूषा साकारली. मुंबई, पुणे, नागपूर, लातूर, हैद्राबाद, औरंगाबाद, जालना, मध्य प्रदेशसह स्थानिक धावपटूंनी सहभाग घेतला.

यांची कामगिरी ठरली सरस
भुसावळ रनर्सचे प्रवीण फालक यांनी 21 किमी गटात दोन तास 20 मिनिटे व प्रवीण पाटील यांनी 10 किमीची मॅरेथॉन 70 मिनिटांत पूर्ण केली. संजय भटकर यांनी 10 किमीचे अंतर केवळ 55 मिनिटात तर रामचंद्र झोपे यांनी 56 मिनिटात पूर्ण केले. सारंग पाटील हे पाच किलोमिटर गटातील स्पर्धेत धावले. 10 किमी गटात पूनम भंगाळे, पूनम कुलकर्णी, चारुलता अजय पाटील, मीना नेरकर, प्रमोद शुक्ला, कल्पेश मनवानी, योगेश पाटील, विजय पाटील, हर्षल लोखंडे, अशोक पाटील, रामचंद्र झोपे, पंकज कुलकर्णी, दर्शन नागदेव, श्रीकांत नगर नाईक, रणजीत खरारे, सुनील सोनगिरे, अजय पाटील, सुधाकर सनांसे, शेख रीजवान, राजेंद्र ठाकूर, अ‍ॅड.तुषार पाटील, महेंद्र पाटील, गणसिंग पाटील, संजय भटकर, समृद्ध भटकर, संतोष मोटवानी, प्रवीण पाटील यांनी सहभाग नोंदवला.

यांचा 21 किलोमीटरमध्ये सहभाग
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सहभागी धावपटू प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ. चारुलता पाटील, सीमा पाटील, विलास पाटील, सागर पाटील, प्रफुल्ल बोरकर, प्रवीण वारके, विलास अहिरे, युवराज सूर्यवंशी आदींनी 21 किमी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !