कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत वारसांना धनादेशाचे वाटप
रावेर : मुक्ताईनगर विधासभा मतदारसंघातील 14 जणांच्या वारसांना कुटुंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप व नैसर्गिक आपत्तीत मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीच्या धनादेशाचे वाटप गुरुवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात येणार्या विविध लाभार्थींसाठी येथील तहसीलदार कार्यालयात धनादेश वाटप करण्यात आला. या प्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन, युवासेना जिल्हा युवाधिकारी अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, पीपल्स बॅक संचालक अरुण महाजन, माजी नगरसेवक सुधाकर महाजन, शिवसेना जिल्हा उप संघटक रवींद्र पवार, युवा सेना तालुका युवाधिकारी प्रवीण पंडीत, शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, नायब तहसीलदार संजय तायडे, संजय गांधी निराधारचे नायब तहसीलदार एम.जे खारे, जे.एन.शेलकर रमजान तडवी आदी उपस्थित होते.

