सरसकट सर्व मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही : मनोज जरांगे पाटलांचा इशारा
Agitation will not stop unless certificates are given to all Marathas: Manoj Jarange Patal warns आंतरवाली सराटी : राज्यातील मराठा समाज एक च असून महाराष्ट्रातील मराठा बांधवांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्यामुळे प्रथम अहवाल स्वीकारा नाही तर दुसरा स्वीकारा मात्र सरसकट प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
तर आंदोलन अधिक तीव्र
सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत मनोज जरांगे म्हणाले की, पुरावे सापडलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्याल, पण हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे, हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. उद्या मंत्रिमंडळात बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकार्यांना बोलवा. आम्ही 40 वर्षे थांबलो आहोत. थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ द्यायचा? त्यामुळे आता मुदतवाढ देण्यास आमचा विरोध आहे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.










