हिंगणघाट घटनेतील दोषीला फाशीची मागणी


मुक्ताईनगरातील मुस्लिम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर :शहरातील मुस्लिम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देवून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात महाविद्यालयात पायी जात असलेल्या एका प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्याने या घटनेचा निषेध करीत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. आरोपी विकेश (विक्की) नगराळे याने केलेले कृत्य हे अत्यंत दुर्दैवी व मानवतेला काळिमा फासणारे असून समस्त मुस्लिम समाज या घटनेचा निषेध करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

यांची होती उपस्थिती
जळगाव मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, रामरहिम रीअल इस्टेटचे किशोर किसन पाटील, मुख्तार खान, शेख असगर शेख अकबर, उर्दू पत्रकार रीजवान चौधरी, शेख आसीफ शेख उस्मान, शेख वसीम कुरेशी, दतु सोनार, बाळू भगवान पाटील, सादिक खाटीक, हुसेन शाह कलंदर शाह, हसन शाह कलंदर शाह आदी समाजबांधव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !