भुसावळातील संविधान बचावो नागरी कृती समितीच्या सभेला परवानगी नाहीच
भुसावळ पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांची माहिती
भुसावळ : संविधान बचावो नागरी कृती समितीतर्फे शनिवार, 8 फेबु्रवारी रोजी दुपारी तीन वाजता भुसावळातील खडका रोडवरील रजा टॉवर, मोहम्मद अली चौक भागात दिल्लीतील जेएनयू नेता उमर खालीद स्वराज्य अभियानाचे योगेंद्र यादव यांची जाहीर सभा होणार होती मात्र या सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची माहिती भुसावळ पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दिली. दरम्यान, पोलिस प्रशासनाने सभेला परवानगी नाकारल्यानंतर आता सभा होते वा नाही? याकडे लक्ष लागले आहे.
सभा होणारच -प्रतिभा शिंदे
सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असलीतरी आम्ही पोलिस प्रशासनाला सभेसाठी मूळातच परवानगी मागितलेली नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून त्या कलमाच्या आधारे आम्ही सभा घेत आहोत, अहिंसात्मक व लोकशाहीच्या पद्धत्तीने आम्ही सभा घेणार असल्याचे लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.



