आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश: चाळीसगाव तालुका गंभीर स्वरूपाचा दुष्काळी घोषित

जळगाव जिल्ह्यातील एकमेव तालुका : शासन निर्णय प्रकाशित झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा: सर्व प्रकारची मदत उभी करणार : आमदार मंगेश चव्हाण


Success in pursuit of MLA Mangesh Chavan : Chalisgaon taluka declared severe drought चाळीसगाव : राज्य शासनाच्या महसूल विभागाने महाराष्ट्र राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा शासन निर्णय मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केला आहे. त्यात चाळीसगाव तालुक्याचा गंभीर दुष्काळी तालुका म्हणून समावेश केल्याने शेतकरी बांधवांना व सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा राज्य शासनाकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला यश मिळाल्याने आगामी काळात सरकारच्या वतीने विविध सवलती, उपाययोजना राबविल्या जातील. जळगाव जिल्ह्यातील एकमेव दुष्काळी तालुका म्हणून चाळीसगावची निवड झाल्याने तालुक्यातील सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश : आमदार चव्हाण
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, चाळीसगाव तालुक्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये 30 दिवसांच्या पावसाचा खंड पडल्याने शेती पिकांची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे पीकविमा धारक शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम नुकसानभरपाई मंजूर झाली असून दिवाळीपर्यंत ती मिळेल सोबतच कमी पावसामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच छोटे मोठे प्रकल्प कोरडेठाक असल्याने गंभीर अशी दुष्काळी परिस्थिती चाळीसगाव तालुक्यात निर्माण झाल्याची बाब मी वेळोवेळी प्रशासनाला व राज्य शासनाला कळवली होती. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाकडे चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा म्हणून शिफारस केली होती. अखेर मंगळवारी शासन निर्णय घोषित झाल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नागरीकानां मिळणार विविध सवलती
चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ घोषित झाल्यामुळे शेतकरीच नव्हे चाळीसगाव तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांना विविध लाभ व सवलती मिळणार आहेत. केंद्र व राज्यातील महायुती सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेच सोबत मीदेखील लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाच्या उपाययोजनांसोबतच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या चाळीसगाव वासीयांना दुष्काळाची कमीत कमी झळ बसेल यासाठी एक परिवार म्हणून काळजी घेणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

दुष्काळ जाहीर झाल्याने चाळीसगाव तालुक्याला मिळणार या सवलती

  • 1) जमीन महसुलात सूट
    2) पीक कर्जाचे पुनर्गठन
    3) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
    4) कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5% सूट
    5) शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
    6)  रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शितलता
    7)  आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर
    8)  टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाचे तोडणी खंडित न करणे यासोबतच सर्वच शेतकर्‍यांना पीकविमा व राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या अनुदानात प्राधान्य मिळणार आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !