जेसीआय भुसावळ ताप्तीचा पदग्रहण सोहळा उत्साहात


भुसावळ : जेसीआय भुसावळ ताप्तीचा पदग्रहण सोहळा बुधवारी शहरातील राधाकृष्ण हॉटेलमध्ये झाला. प्रमुख पाहुणे म्हणून झोनल पास प्रेसिडेंट रश्मी शर्मा, झेडव्हिपी चेतन पाटील, झेडजीपी संगीता अग्रवाल, पी.झेडपी गोपाल पटवारी, योगीता झवर, डॉ.हर्षिता अग्रवाल हे होते. मावळते अध्यक्ष योगीता झवर यांनी नुविन अध्यक्ष दीपा पटेल यांना पदभार सोपविला तर मावळत्या सेक्रेटरी डॉ.हर्षिता अग्रवाल यांनी नुतन सेक्रेटरी करिणा छाबडा यांना पदभार सोपविला.

यांची होती उपस्थिती
पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.निलेश झंवर, डॉ.मोनिका अग्रवाल, संजय यावलकर, राजेश झंवर, रजनी सावकारे, निकीता आहुजा, डिम्पल छाबडा, जयश्री अग्रवाल, रेखा गोस्वामी, शशी स्वामी, स्वाती देव, मोहिनी देव, दीपा आहुजा, रीया छाबडा, प्रिया छाबडा, सोनल झवर उपस्थित होते. गोपाल पटवारी व चेतन पाटील, रश्मी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्रृती लाहोटी यांनी तर आभार नुतन सेक्रेटरी करीना छाबडा यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !