जेवण न दिल्याने जळगावात हॉटेल चालकावर हल्ला


जळगाव : जेवण न दिल्याचा राग आल्याने हॉटेल चालकावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. जळगाव-पाचोरा रोडवर दिनेश सिताराम माळी (42, रा.शिरसोली) यांनी बंद पडलेली हॉटेल चंद्रमा भाड्याने घेतली असून तिचे ‘एमएच 19’ नामकरण केले आहे. शुक्रवारी रात्री जळगाव शहरातील कंजरवाडा येथील रहिवासी कालू व त्याचा मित्र सोनू कंजर असे दोघे त्याच्या अनोळखी चार मित्रांना घेवुन जेवणासाठी आले होते. मात्र दिनेश माळी यांनी त्यांना जेवण नाही असे सांगून परत जाण्यास सांगीतले. सर्वांनी तेथून निघून जात वेगळ्या हॉटेलमध्ये जावून मद्यप्राशन केल्यानंतर माळी यांच्या हॉटेलवर येवून आम्हाला जेवण का दिले नाही ? असे म्हणत दिनेश माळी व नितीन अशोक नानपुरे अशा दोघांना लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण करुन हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. दिनेश माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.


कॉपी करू नका.