यावल तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर


यावल : तालुक्यातील सप्टेंबर 2020 मध्ये मुदत संपणार्‍या 48 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आला. सप्टेंबरअखेरपर्यंत मुदत संपणार्‍या आगामी 48 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्य्रकम जाहीर करण्यात आला आहे.

या गावांमध्ये होणार निवडणूक
तालुक्यातील चिंचोली, दहिगाव, उंटावद, शिरसाड, मनवेल, पिळोदे खुर्द, बोरावल बुदु्रक, भालशीव, पिंप्री, बामणोद, वनोली, अंजाळे, टाकरखेडा, बोरावल खुर्द, कोळवद, कासवे, दुसखेडा, सांगवी खुर्द, हंबर्डी, राजोरा, बोरखेडा बुद्रुक, विरावली, वड्री, शिरागड, हिंगोणे, डोंगरकठोरा, सांगवी बुुद्रुक, आमोदे, विरोदा, वढोदा प्र.सावदा, नावरे, डोणगाव, किनगाव बुदु्रक, आडगाव, अट्रावल, भालोद, नायगाव, सावखेडासीम , मोहराळे, कोरपावली, महेलखेडी, वढोदे प्र.यावल, पिंपरूड, कोसगाव, मारूळ, डांभुर्णी, निमगाव, सातोद या गावांसाठी निवडणूक होणार आहे.




असा आहे निवडणूक कार्यक्रम
ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय रचना व हरकती व सुचना मागविण्याच्या कार्यक्रमांतर्गत 7 ते 14 फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेला प्रसिध्दी, हरकती व सुचना मागवणे, 20 फेब्रुवारीला प्राप्त सुचना व हरकती प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करणे, 29 फेब्रुवारी रोजीे प्राप्त हरकतीवर प्रांताधिकाी यांच्याकडे सुनावणी व व अभिप्रायासह जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे, 21 मार्च रोजी अंतिम प्रसिद्धी असा कार्यक्रम आहे. 2020 च्या ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकीसाठी महसुल प्रशासनाने प्राधिकृत मंडळाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी अशा सुमारे शंभरहुन अधिक अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आल्याचे तहसीलदार जितेंद्र कुंवर म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !