भुसावळातील अन्यायकारक मालमत्ता कराविरोधात शिवसेना मैदानात

वाढीव कर आकारणी रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


Shiv Sena in the field against unjust property tax in Bhusawal भुसावळ : भुसावळ पालिकेने कंत्राटदारामार्फत शहरातील मालमत्तांचे रीव्हीजन केल्यानंतर त्यातून अनेक अनागोंदीचे प्रकार समोर आल्यानंतर या प्रश्नी आता शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरला आहे. भुसावळ पालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांना या संदर्भात बुधवारी निवेदन देण्यात आले असून अन्यायकारक व अवाजवी कर आकारणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली शिवाय या प्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अवाजवी कर आकारणी रद्दची मागणी 
शिवसेना पदाधिकार्‍यांच्या निवेदनानुसार पालिकेने विशेष शिक्षण कर, शिक्षण कर, मालमत्ता कर, जलनिस्सारण कर व वृक्षारोपण कर आकारून नाहक शहरवासीयांना भूर्दंड दिला आहे. शैक्षणिक कर दोन वेळा कशासाठी ? मालमत्ता कराची, वृक्षारोपण कर, जलनिस्सारण कर याबाबतीत नागरीकांना कुठल्याही समाधानकारक सुविधा उपलब्ध नाही तर पिण्याचे पाणी दहा दिवस उलटूनही दिले जात नाही तर नगरपालिका शाळेत योग्य त्या सुविधा नाहीत. त्यामुळे अवाजवी कर आकारणी तातडीने रद्द करावी तसेच खाजगी ठेकेदाराने चुकीच्या पद्धत्तीने केलेली आकारणी तातडीने रद्द करावी व पुन्हा फेर मूल्यांकन करावे अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला अहे.

यावेळी शहरप्रमुख दीपक धांडे, बबलू बर्‍हाटे, पवन नाले, पिंटू भोई, स्वप्नील सावळे, दिलीप सुरवाडे, यश फालक, मनोज पवार, महमूद शेख, सोनी ठाकूर आदींची उपस्थिती होती.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !