राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपात येण्यासाठी उत्सुक
केंद्रीय अन्न व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट
औरंगाबाद : राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच भाजपने विरोधी पक्षातील आमदारांचा पक्षप्रवेशाचा धडाकाच लावला आहे. आता पुन्हा राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे तसेच, काँग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांगा लावून उभे आहेत मात्र सामाजिक समीकरण व राजकीय परीस्थिती विचारात घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे दानवे म्हणाले.