अट्टल घरफोडे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


रामानंद नगर व एमआयडीसी हद्दीत घरफोडीची दिली कबुली

जळगाव : शहरातील रामानंद नगर व एमआयडीसी हद्दीत घरफोडी करणार्‍या पाच घरफोड्यांच्या मुसक्या आवळण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला गुरूवारी यश आले आहे. आरोपींनी घरफोड्यांची कबुली देत चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने काढून दिले आहेत. आरोपींच्या चौकशीत अन्य काही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुरजितसिंग सुजाणसिंग बावरी (रा.तांबापूर जळगाव), विशाल संतोष भोई (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव), विशाल मुरलीधर दाभाडे (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव), राहूल नवल काकडे (रा.समता नगर, जळगाव) व गिरीष अशोक जाधव (रा.खुपचंद साहित्य अपार्टमेंट, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेहत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक बापू रोहम, हवालदार राजेश मेढे, संजय हिवरकर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, गफूर तडवी, महेश पाटील, मुरलीधर बारी आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !