मनवेलच्या 22 वर्षीय गरोदर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


A 22-year-old pregnant woman of Manvel committed suicide by hanging herself यावल : यावल तालुक्यातील मनवेल येथील 22 वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. विवाहितेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. मयत विवाहितेसह तिच्या पोटातील बाळदेखील दगावले आहे तर याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मनवेल, ता.यावल येथील रहिवाशी शीतल उर्फ रुपाली विजय कोळी (22) या गरोदर विवाहितेने छताच्या आडव्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तिला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.



विवाहितेसोबत अर्भकाचा मृत्यू
विवाहिता गरोदर होती व तिच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते मात्र तेदेखील दगावले आहे. विवाहितेने टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत माहिती कळू शकली नाही. यावल पोलिसात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !