गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस बाळगणार्‍या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना अटक

भुसावळ रेल्वे केला सायडींगजवळ कारवाई : वाहन मालक पसार


Two arrested including Gavathi Katta and a private security guard carrying five live cartridges भुसावळ : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे झायलो वाहनात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूसांसह अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकाच्या केला सायडींगजवळ ही कारवाई गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. योगेश महेश वंजारे (बौद्ध विहार, खडका, ता.भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (वीटभट्टी ताजी, धुळे, ह.मु.खडका सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर झायलो मालक विलास सपकाळे (शांती नगर, भुसावळ) हे पसार आहेत. तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. रेल्वे केला सायडींगजवळ गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयित झायलो (एम.एच.19 बी.जे.8199) मधून आल्यानंतर त्यांना पोलिसांना अडवत वाहनातील दोघा संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून 35 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले.



यांनी केली कारवाई
संशयितांनी हा कट्टा व झायलो वाहन विलास सपकाळे यांचे असल्याचे सांगितल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, सहाय्यक फौजदार जाकीर सैय्यद, हवालदार सुपडा पाटील, नाईक विकास बाविसकर, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !