भुसावळातील सभेत योगेंद्र यादव करणार मार्गदर्शन


सभेची आयोजकांकडून जय्यत तयारी : पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त

भुसावळ : संविधान बचावो नागरी कृती समितीतर्फे शनिवार, 8 फेबु्रवारी रोजी दुपारी तीन वाजता शहरातील खडका रोडवरील जीएनजी पार्कवर एनआरसी, एनपीआरए कायद्याच्या विरोधात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी दिल्लीतील जेएनयू नेता उमर खालीद यांना पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असून स्वराज्य अभियानाचे योगेंद्र यादव आता शनिवारी दुपारी तीन वाजता सभेत मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी उमर खालीद व जिग्नेश मेवानी यांच्या सभांच्या परवानगीवरून संविधान बचाव कृती समितीचे समर्थक व संविधान समर्थन समितीचे विरोधक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या दालनात समोरा-समोर आले होते. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने पेच निर्माण झाला होता मात्र जिल्ह्यातील सभांना जेएनयू नेता उमर खालीद यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टीव्हीवर जे नेते बोलतात ते कायद्यात लिहित नाहीत
अमळनेर :
जे नेते टीव्हीवर बोलतात ते कायद्यात लिहित नाहीत, अशी टिका करीत राजकीय विचारवंत, कृषी चळवळीचे मार्गदशक योगेंद्र यादव येथील सभेत म्हणाले की, देशाचे मूळ कापणे म्हणजे देशद्रोह असून सीएए व एनआरसी कायदा आणून सरकार देशाच्या एकात्मतेत फूट पाडण्याचे काम करीत आहे. सरकारच हा देशद्रोह करीत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित ‘भारत संविधान लोकशाही’ या विषयावर लोकशाही बचाव समितीतर्फे आयोजित सभेत शनिवारी सकाळी ते बोतत होते.

पुरावा न आणल्यास न्यायालयात पाठवण्यात येईल
योगेंद्र यादव म्हणाले की, सीएए कायदा नागरीकांत दुफळी निर्माण करणारा असून एनआरसी व एनपीआर म्हणजे काही माहिती सांगू न शकल्यास किंवा चुकल्यास नागरीकांवर संशयाचा ठपका लावण्यात येईल, अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर तुम्हाला नोटीस देऊन तुमच्याकडे भारतीय असल्याचा पुरावा मागितला जाईल, जन्माचा पुरावा मागितला जाईल. आज अनेक लोक आणू शकत नाहीत आणि अशा लोकांना विदेशी न्यायालयात पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, आमदार अनिल पाटील, करीम सालार यांची भाषणे झाली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !