बोदवडमधील यूवक पश्‍चिम महाराष्ट्रात राबवणार स्वच्छता मोहिम


बोदवड : पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर सातार्‍याला महापुराचा मोठा फटका बसल्यानंतर अद्यापही पाणी ओसलेली नसल्याने नागरीकांचे अतोनाल होत होत आहेत शिवाय अस्वच्छतेमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्याने मदतीचा हात देण्यासाठी व घरात उरलेला चिखल, पाण्यासोबत वाहून आलेली घाण बाहेर काढण्यासाठी बोदवडमधील महाकाल ग्रुपच्या वीस युवकांनी पुढाकार घेतला असून नुकतेच हे युवक रवाना झाले. सोबत जीवनावश्यक वस्तूंसह लहान मुलांचे कपडे तसेच पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी टोपले फावडे, फॉगिंग मशीन (धुरळणी यंत्र), फिनाईल कॅन, मेडिकल, डेटॉल, दोरी यासह स्वच्छतेचे साहित्यासह हे युवक रवाना झाले.

व्यापारी संघटनेने दिले 41 हजार
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात व्यापारी संघटनेकडून 41 हजारांची मदत महाकाल ग्रुपच्या खर्चासाठी व साहित्य घेण्यासाठी देण्यात आली. प्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल, उपाध्यक्ष राजेश नानवाणी, मिठूलाल अग्रवाल, गिरधारी पंजवाणी, सुरेश माळी, शांताराम कोळी, भास्कर गुरचळ या व्यापार्‍यांनी स्वच्छता मोहीम राबविण्यास जाणार्‍या महाकाल ग्रुपला हिरवी झेंडी दाखवली.

हे सदस्य राबवणार स्वच्छता मोहिम
महाकाल ग्रुपतर्फे पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी महाकाल ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप मिलांडे, प्रिंटेश बरडीया, प्रकाश जाट, राहुल जाट, मुकुंद जाट, सागर मोरे, चिकू खाटीक, आकाश चोपडे, पवन हिवराळे, राज सारवान, अतुल अवसरमल, ईश्वर बोदडे, कमलेश तायडे, सागर गंगतिरे, रोहित छपरीबन, सुनील हिवराळे, संदीप मिलांडे यासह महाकाल ग्रुपचे सदस्य सहभागी झाले आहेत.

आठवडाभर राबवणार मोहिम -मिलांडे
महाकाल ग्रुप अध्यक्ष प्रदीप मिलांडे म्हणाले की पूरग्रस्त भागात सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या गावातील व घरामधील स्वच्छता करण्याच्या हेतूने महाकाल ग्रुप पूरग्रस्त भागात सहा दिवस स्वच्छता मोहिम राबविण्यात आहे.


कॉपी करू नका.