विद्यार्थ्यांनी लिंगभाव विसरून व्यक्ती म्हणून स्वतःला विकसीत करावे
डॉ.शोभा शिंदे : भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात व्याख्यान
भुसावळ : पुरुषी मानसिकता व स्त्री मानसिक गुलामगिरी यातून विद्यार्थ्यांनी स्वतःला दूर सारून व्यक्ती म्हणून सिद्ध करावे. पुरूष व स्त्री दोघेही समान असून त्यांनी जीवन क्रांती घडवून आणावी व विद्यार्थ्यांनी लिंगभाव विसरून व्यक्ती म्हणून स्वतःला विकसीत करावे, असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माजी संचालक तसेच भाषा विभागाच्या डॉ.शोभा शिंदे यांनी येथे केले. पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात मानव्य विद्याशाखेंतर्गत सुरू असलेल्या लिंगभाव समानता सप्ताहाचे आयोजन केले असून शुक्रवारी डॉ.शिंदे यांचे व्याख्यान झाले.
यांची व्यासपीठावर उपस्त्तिी
व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, समन्वयक डॉ.प्रफुल्ल इंगोले, डॉ.रेखा गाजरे, डॉ.एस.पी.झनके व डॉ.स्मिता चौधरी उपस्थित होत्या.
तर स्त्रिया गुलामगिरीतून बाहेर
डॉ.शोभा शिंदे यांनी मार्गारेट अटवूड, अश्विनी ढौगडे या स्त्रीवादी कवयित्रींच्या कवितेतील लिंगभवाबद्दल चर्चा करीत शिक्षणाचा सदुपयोग हा तेव्हाच होईल जेव्हा स्त्रिया या मानसिक गुलामगिरीतून बाहेर येतील.शिंदे यांनी विविध वृतपंत्राचा दाखला देऊन जगात होणार्या स्त्री अत्याचाराबद्दल माहिती दिली. भारत सुद्धा स्त्रियांसाठी धोकादायक होत असून त्यांना अनेक अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. स्त्री ही जन्माने स्त्री नसते तर तिला स्त्री बनवली जाते यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. स्त्रियांनी पुरुषी गुलामगिरीतून बाजूला सरून आपला विकास केला पाहिजे. सर्वच पुरुष वाईट आहेत वा असतात असेही नाही तर 95 टक्के पुरूष अत्याचारी नसतात. त्यात. वडील, भाऊ, पती, मित्र यांचा समावेश होतो त्यामुळे सर्वच पुरुषांकडे संशयित नजरेतून बघणे योग्य नाही. डॉ.स्मिता चौधरी यांनी सूत्रसंचालन तर अदनान अहमद याने आभार मानले. प्रा.एन.एन.झोपे, डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.हिवाळे, प्रा.दीपक शिरसाट, प्रा.सचिन राजपूत, प्रा.निखील तायडे, डॉ.सुषमा अहिरे, डॉ.स्वाती महाजन आदींची उपस्थिती होती.

