सोयगावात दुष्काळाचे पंचनामे पूर्ण ; कपाशीचे 35 हजार 62 हेक्टरवर नुकसान : शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा
Panchnama of drought complete in Soygaon ; Loss of cotton on 35 thousand 62 hectares: Farmers waiting for help सोयगाव : सोयगावसह तालुक्यात कृषीच्या पथकांनी दुष्काळाच्या संदर्भात 33 टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहे. यामध्ये खरीपाच्या 42 हजार 373 लागवडी योग्य क्षेत्रा पैकी 42 हजार 328 हेकटरवर खरीपाची पिके बाधित झाल्याचा अहवाल शनिवार, 18 रोजी तालुका कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे दुष्काळाचा सर्वेक्षण अहवाल पाठविला आहे त्यामुळे आता सोयगाव तालुक्यातील शेतकर्यांना दुष्काळाच्या मदतीची प्रतीक्षा लागून आहे.
33 टक्क्यांपेक्षा अधिक पिके बाधीत
सोयगाव तालुक्यात शासनाने अति गंभीर दुष्काळाची घोषणा महिनाभर पूर्वी केली होती त्या अनुषंगाने दुष्काळामध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या कपाशी, तूर मका, सोयाबीन, उडीद, ज्वारी, बाजरी या प्रमुख सात खरीपाच्या पिकांची सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांनी कृषीच्या विविध पथकांनी बाधित क्षेत्राचे पंचनामे हाती घेतले होते यामध्ये सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या छायेत 42 हजार 328 हेक्टरवर पिके 33 टक्क्यांच्या पेक्षा अधिक बाधित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
कपाशीला सर्वाधिक फटका
दरम्यान, सोयगाव तालुक्यात यंदा दुष्काळात कपाशीच्या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून 35 हजार 062 हेकटरवर कपाशीच्या पिकांचे 33 टक्क्यांच्या पेक्षा अधिक नुकसान झाले आहे दुष्काळ चा सर्वेक्षण अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे त्यामुळे आता शेतकर्यांना दुष्काळा च्या मदतीची प्रतीक्षा लागून आहे दरम्यान दुष्काळा मध्ये सोयगाव मंडळात 11 हजार 864 हेकटरवर नुकसान झाले आहे यामध्ये 10 हजार 251 हेकटरवर कपाशीच्या पिकांची समावेश आहे बनोटी मंडळात 12,367 हेकटरवर खरिपाच्या पिकांचे दुष्काळात नुकसान झाले आहे यामध्ये 10,896 हेकटरवर कपाशीच्या पिकांची नुकसान आहे जरंडी मंडलात 9,052 हेकटरवर तडाखा बसला आहे कपाशीची क्षेत्र 8,222 हेकटरवर बाधित झाले आहे सावळदबारा मंडळात 9,045 हेक्टरवर खरिपाच्या पिकांची 33 टक्क्यांच्या अधिक बाधित असून कपाशी च्या पाच हजार 693 हेक्टरवर दुष्काळाचा फटका बसला आहे.
मदतीसाठी शासन स्तरावरून निर्णय
सोयगाव तालुक्यात दुष्काळाचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे सोयगाव तालुक्यात शंभर टक्के खरिपाच्या पिकांचे क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. आता शासनाकडून मदत मिळण्यासाठी शेतकर्यांना कोणत्याही अडचणी शिल्लक राहिलेल्या नाहीत. मदती साठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल त्यानुसार सोयगाव तालुक्यात अंमलबजावणी करण्यात येईल, असे सोयगाव तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया म्हणाले.



