राजस्थानात अपघात : धुळे जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू


दोंडाईचा : भरधाव कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे तीन वाजता नीमच महामार्गावरील जालिया चेक पोस्टजवळ हा अपघात घडला. या अपघात कार चालक अब्दुल सुभान पिंजारी, सौरभ महेंद्र पाटील (रा.दोंडाईचा) व गिरीश विठ्ठल मराठे (रा.वरूळ) हे तिघे मयत झाले असून आणखी तीन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दोंडाईचा येथील माजी नगरसेवक महेंद्र पाटील यांच्या मालकीच्या कारने (एम.एच. 18 बी.सी 2097) त्यांचा मुलगा सौरभ व शालक हेमंत पाटील हे मामा-भाचे मित्रांसोबत राजस्थानमध्ये फिरण्यासाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !