बडनेरा-नाशिक-बडनेरा विशेष गाडीला मुदतवाढ
भुसावळ : रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी पाहता बडनेरा-नाशिक-बडनेरा गाडीला मुदतवाढ करण्यात आली आहे. 19 ऐवजी ही गाडी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01211 विशेष मेमू बडनेरा येथून दररोज सकाळी 11.05 वाजता सुटेल व नाशिक येथे त्याच दिवशी सायंकाळी 7.40 वाजता पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 01212 विशेष मेमू नाशिक येथून दररोज रात्री 9.15 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसर्या दिवशी दुपारी 4.35 वाजता पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांनी युटीएस अॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.








