सुटीच्या दिवशी तहसीलदारांच्या धडक कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ
रावेर- सुटीच्या दिवशी भोकर नदीपात्रात उतरून रावेरच्या तहसीलदारांनी अवैध वाळू उपसा करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी सुटी असल्याने भोकर नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसील प्रशासनाला कळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे आपल्या पथकासोबत पातोंडीनजीक असलेल्या भोकर नदीत उतरले व सुमारे एक किमी चालत जाऊन अवैध वाळू उपसा करणार्या टॅक्टर-टॉली (एम.एच.19 ए 1799) जप्त करण्यात आली. प्रसंगी खानापूर मंडळ अधिकारी प्रदीप आळे व तलाठी एन.आर.चौधरी उपस्थित होते. दरम्यान, अवैध वाळू उपसा करणार्यांना सुगावा न लागण्यासाठी तहसीलदारांनी आपले वाहन दूरवर उभे करून भोकर नदीपात्रात सुमारे एक किमी पायी चालत गेल्या व अवैध वाळू उपसा करणार्यांवर धडक कारवाई केली.

